

Vaibhav Sooryavanshi | India A vs UAE | Rising Star Asia Cup 2026
Sakal
India A vs UAE, Rising Stars Asia Cup 2026 : रायझिंग स्टार आशिया कप २०२६ स्पर्धेत मंगळवारी भारतीय अ संघाने आणि १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे. मंगळवारी फक्त ८६ चेंडूत भारताने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध (UAE) सामना जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या सामन्यात एकट्या वैभव सूर्यवंशीनेच वादळी द्विशतक केले. त्यासोबतच अनेक विश्वविक्रमही घडले.
युएईने प्रथम फलंदाजी करताना हरप्रीत सिंग भाटियाच्या १३० धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ५० षटकात ८ बाद २४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने १४.२ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. यात एकट्या वैभव सूर्यवंशीने २०४ धावांचे योगदान दिले. त्याने ५३ चेंडूत ७ चौकार आणि २८ षटकारांसह ही खेळी केली.