मुंबई

ही केवळ सुरुवात, लवकरचं आंदोलन जोम धरणार

CD

ही केवळ सुरुवात; आंदोलन जोम धरणार
जेन झी आणि विद्यार्थी संघटनांचा दावा

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) शुक्रवारी (ता. २) शिवाजी पार्कवर आंदोलन केले. काही महिन्यांपूर्वी येथेच झालेल्या आंदोलनाच्या तुलनेत प्रतिसाद कमी असला तरी जेन झीचा उत्साह मात्र कायम असल्याचे चित्र दिसले.
हा मुद्दा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापेक्षा संपूर्णत: वेगळा आहे. सध्या या आंदोलनाची पायाभरणी सुरू असून, पुढच्या काळात आंदोलन आणखी जोम धरेल, असा आशावाद जेन झी तरुणांनी व्यक्त केला. आजच्या आंदोलनाला कमी उपस्थिती असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सीजेपी कार्यकर्त्याने गेल्या वेळी शिवाजी पार्कमधले आंदोलन पहिल्याच दिवशी मोठे झाले नव्हते. आधी मुद्दा जनतेपर्यंत पोहोचावा लागतो. त्यावर व्यापक चर्चा होते. त्यानंतर सहभाग वाढतो, असा युक्तिवादही केला. आजचे सीजेपीचे आंदोलन ही केवळ सुरुवात असून, लवकरच टप्प्याटप्प्याने हे आंदोलन देशाच्या विविध ठिकाणी नेण्याची तयारी सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि जेन झी तरुणांना निवडणूक आयोगासंदर्भातील आंदोलनाशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती अनेकांना कळत नाही. त्यामुळे तरुणाई आणि निवडणूक आयोगाचा गैरव्यवहार हे समीकरण समजून सांगावे लागेल. त्यानंतर पुढच्या टप्प्यात हे आंदोलन सुरू होईल, असे एका विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
...
पूर्वीच्या आंदोलनाचा दाखला
सीजेपीने जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले होते, त्या वेळी सुरुवातीचे काही दिवस आंदोलनाला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, पुढे संपूर्ण देश त्या आंदोलनाशी कनेक्ट झाला आणि आंदोलनाला देशव्यापी स्वरूप आले. नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी झालेले हे आंदोलन पुढे जनआंदोलनात रूपांतरित झाले. त्याची परिणती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यात झाली, याची आठवणही कार्यकर्त्यांनी करून दिली.
...
आज शिवाजी पार्कवर अपेक्षेएवढी गर्दी नसली, तरी ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळेल याची खात्री आहे.
- अल्केश गावित, पुणे, न्यू स्टुडंट अँड यूथ फेडरेशन
...
कोणतेही आंदोलन पहिल्या दिवसापासून मोठे होत नाही. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची धग वाढते. पुढील टप्प्यात आंदोलनाला देशव्यापी स्वरूप मिळेल.
- पंकज प्रभाकर कांबळे, आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT