मुंबई

‘ज्ञानेश्वरी'' कालही, आजही आणि उद्याही प्रासंगिक ; डॉ. मोहन भागवत

CD

ज्ञानेश्वरी कालसुसंगत ः सरसंघचालक
‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण

मुंबई, ता. २ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ या ॲपचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना भागवत यांनी ज्ञानेश्वरीचे महत्त्व अधोरेखित करीत ज्ञानेश्वरी कालही प्रासंगिक होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असे प्रतिपादन केले.
ज्ञानेश्वरी ही भगवद्‍गीतेवर आधारित असून, भगवद्‍गीता भारतीय विचारपरंपरेचा सारांश आहे. मानवी जीवन, कर्तव्य, जगाचे स्वरूप आणि माणसाने कसे जगावे, यासंबंधीचा मूलभूत विचार त्यात असल्याने त्याचे महत्त्व शाश्वत आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात व्हॅल्यूएबल ग्रुप प्रस्तुत आणि मेरो इव्हेंट्स आयोजित कार्यक्रमात ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ या मोबाइल ॲपचे लोकार्पण भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्यासह व्हॅल्यूएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे, मंजिरी हेटे, रेणुका देशकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी हेटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ज्ञानरंग : माऊलींच्या ओव्यांचा उत्सव’ सादर करण्यात आला.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, की काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि अभिव्यक्तीची पद्धतही बदलते; मात्र शाश्वत तत्त्वे बदलत नाहीत, असे सांगत त्यांनी विविध महापुरुषांनी त्यांच्या काळानुसार एकाच मूलभूत सत्याची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केल्याचे स्पष्ट केले. केवळ शब्द किंवा बाह्य आचार न पाहता त्यामागील दिशा आणि तत्त्व समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की आध्यात्मिक ज्ञान हे निवृत्तीनंतरचे किंवा वृद्धापकाळातील विषय असल्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तत्त्वज्ञानाचा व्यवहारात उपयोग नसेल तर त्या तत्त्वाची महत्ता काय, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी ज्ञानेश्वरीतील विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले. ज्ञान, बुद्धी, मन आणि शरीर यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. अहंकारामुळे हा समन्वय बिघडल्यास जीवन अस्थिर होते. त्यामुळे रोजच्या जीवनात योग्य दिशा मिळण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
...
‘रोज एक ओवी ऐका, वाचा आणि जगा’
नव्या पिढीपर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचवण्यासाठी ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला. आजच्या काळात दीर्घकाळ वाचन किंवा श्रवण करण्याची सवय कमी होत असल्याचा उल्लेख करीत त्यांनी रोज एक ओवी ऐकावी, वाचावी, अनुभवावी आणि अनुभवून मग जगावी, असे आवाहन केले. तसेच ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी रोज थोडा वेळ दिला तरी त्यातून जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. पूर्ण आयुष्यात पाच वाईट गोष्टी कमी होऊन त्यांच्या जागी पाच चांगल्या गोष्टी आल्या तरी तो मोठा बदल असेल, असेही भागवत म्हणाले.
...
भारतीय ज्ञानपरंपरेत जगाला दिशा देण्याची क्षमता
भारताकडे केवळ भौतिक ज्ञान नव्हे, तर जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरणारी आध्यात्मिक आणि तात्त्विक ज्ञानपरंपरा असल्याचे भागवत यांनी सांगितले. जगभरातील लोक भारताकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जगाच्या कल्याणासाठी भारतीय ज्ञानपरंपरेचा उपयोग करण्याची जबाबदारी असल्याचे भागवत यांनी अधोरेखित केले.
...
उपक्रमाचे सार्थक करा!
ज्ञानेश्वरीचा अभ्यास केवळ ग्रंथ म्हणून न करता तिच्यातील विचार जीवनात उतरवण्याची आवश्यकता असल्याचे भागवत यांनी सांगितले. घराघरात ज्ञानेश्वरी ऐकली, वाचली आणि त्यानुसार जीवनात छोटे छोटे बदल घडले, तर त्यातून व्यक्ती, समाज, देश आणि जगाच्या कल्याणाला हातभार लागू शकतो, असे त्यांनी नमूद केले. ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपच्या माध्यमातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे सार्थक करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT