मुंबई

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरण ‘हायअलर्ट’

CD

दुष्काळी परिस्थितीमुळे
महावितरण ‘हायअलर्ट’

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यात दुष्काळी संकट असल्याने महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’ जारी केला आहे. शासनाच्या दुष्काळातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.

राज्यात यंदा जूनपासून पर्जन्यमानात मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके संकटात सापडलेली आहेत. याची दखल घेऊन राज्य सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महावितरणने राज्यभरातील तांत्रिक यंत्रणेला सतर्क केले आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापल्या मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एखाद्या कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून किंवा तातडीने दुरुस्ती कामे करून तो पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामात हयगय करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT