मुंबई

सरकार नेमके काय करत आहे?: जितेंद्र आव्हाड

CD

पूर्णेकर हत्या प्रकरण
सरकार नेमके काय करीत आहे? : जितेंद्र आव्हाड
ठाणे पोलिस आयुक्तालयावर ९ ऑक्टोबरला सर्वपक्षीय मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : सर्वसामान्य माणूसच सुरक्षित नसेल, तर सरकार नेमके काय करीत आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी (ता. ३) केला. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्षपणे करण्याची मागणी त्यांनी केली.
पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करीत मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि धर्मराज्य पक्षासह विविध विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. ‘भयमुक्त ठाणे’च्या मागणीसाठी ९ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजता ठाणे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
आव्हाड म्हणाले, ‘‘पोलिसांवर आरोप करून त्यांच्यावर दडपण आणण्याची माझी भूमिका नाही; मात्र तपास निष्पक्ष झाला पाहिजे. उगाच कोणाला गुन्हेगार ठरवणे किंवा कोणावर आरोप ठेवणे हा मुद्दा नाही. तपास यंत्रणांनी सत्य बाहेर काढून न्याय मिळवून द्यावा, एवढीच अपेक्षा आहे.’’ पोलिसांनी कोणत्याही राजकीय अथवा अन्य दबावाखाली काम करू नये, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष राहुल पिंगळे यांनी पूर्णेकर हत्या प्रकरणातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा संदेश दिला जात असल्याचा आरोप केला. सत्तेचा आणि धनशक्तीचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार थांबवण्यासाठी सर्वपक्षीय शक्ती एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.
----
ठाणे भयमुक्त करण्यासाठी सर्वपक्षीय लढा : राजन विचारे
माजी खासदार राजन विचारे यांनीही ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. पोलिसांवर हल्ले होत असतील आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यास विलंब होत असेल, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे भयमुक्त करण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
----
ठाण्याची ओळख बदलतेय : राजन राजे
धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांनी वाढती गुंडगिरी, हत्या आणि राजकीय दहशतीमुळे ठाण्याची ओळख बदलत असल्याचा आरोप केला. प्रत्येक गुन्हेगारावर कोणताही राजकीय दबाव न ठेवता तातडीने, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
----
५०वी हत्या होण्याची वाट पाहायची का? : अविनाश जाधव
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही ठाण्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरून प्रशासनाला लक्ष्य केले. ‘‘महिन्याभरात पाच हत्या झाल्या. त्यात एक पोलिस आणि एक कार्यकर्ता गेला. पाच महिन्यांत ४९ हत्या झाल्या असतील, तर आता ५०वी हत्या होण्याची वाट पाहायची का?’’ असा सवाल त्यांनी केला. ९ ऑक्टोबरच्या मोर्चानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT