मुंबई

डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CD

डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. ३ : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोली भाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१व्या शतकातील डिजिटल युगात ज्ञानभाषा म्हणून सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रम एसएनडीटी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत, महापौर रितू तावडे, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते. या वेळी ‘मराठीचे कौतुक भाग-२’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्राकडून अभिजात दर्जा मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरमध्ये ११ ते १३ लाख शब्द आहेत. प्रमाण मराठीसोबतच राज्यात विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोली या मराठीचा अमूल्य ठेवा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
--
विविध देशांमध्ये मराठी पोहोचवणार!
संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या समृद्ध परंपरेने नटलेली मराठी आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. जगातील ५० हून अधिक देशांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढविण्याचा संकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
--
लंडनमध्ये ‘मराठी वैश्विक केंद्र’ : सामंत
पुण्यातील डेक्कन विद्यापीठात मराठी भाषेचे उत्कृष्टता केंद्र, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठी वैश्विक केंद्र, राज्यातील विविध बोली भाषांचे १०० कोश आणि नऊ ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT