मुंबई

भाजपचा चार तास ठिय्या; सायंकाळी बविआकडून रीतसर लोकार्पण

CD

क्रीडा संकुलाच्या उद्‍घाटनावरून भाजप-बविआत हायहोल्टेज ड्रामा
भाजपचा चार तास ठिय्या; सायंकाळी बविआकडून रीतसर लोकार्पण
नालासोपारा, ता. ३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने विरार पश्चिमेतील बोळिंज येथे उभारलेल्या क्रीडा संकुलाच्या उद्‍घाटनावरून शनिवारी (ता. ३) भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये (बविआ) जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. उद्‍घाटनाच्या श्रेयावरून सकाळपासून सुरू असलेल्या या वादात भाजपचे खासदार, दोन आमदार, विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांनी क्रीडा संकुलात ठिय्या आंदोलन केले. तब्बल चार तासांच्या या आंदोलनानंतर पोलिस आणि महापौर अजीव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर भाजपने शिडीला फीत बांधून उद्‍घाटन केले. त्यानंतर सायंकाळी बविआकडून माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचे रीतसर उद्‍घाटन करण्यात आले.

माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून वसई-विरार महापालिकेने हे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारले आहे. भाजपचे दोन आमदार, खासदार आणि पालिकेत विरोधी पक्षनेता निवडून आल्यानंतर या प्रकल्पाच्या श्रेयावरून भाजप आणि बविआमध्ये वाद सुरू झाला. क्रीडा संकुलाच्या उद्‍घाटनाचे बविआकडून महापालिकेतर्फे आयोजन केले होते. हा कार्यक्रम माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने ठेवण्यात आल्याने भाजपने त्याला आक्षेप घेतला.

शासकीय राजशिष्टाचाराचे पालन झाले नसल्याचा आरोप करीत भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक आणि विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्यासह भाजप नगरसेवकांनी क्रीडा संकुलात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. गेट आणि बॅरिकेडिंगवरूनही काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

महापौर अजीव पाटील आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर भाजपने आपले आंदोलन मागे घेतले. या वेळी शिडीला फीत बांधून भाजपकडून उद्‍घाटन करण्यात आले, तर सायंकाळी बविआकडून माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचे नियोजित उद्‍घाटन करण्यात आले.

दरम्यान, एका महापालिका प्रकल्पाच्या उद्‍घाटनावरून खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींनी ठिय्या आंदोलन केल्याने दिवसभर शहरातील राजकीय वातावरण तापले होते. उद्‍घाटनाच्या श्रेयावरून झालेल्या या संघर्षाची शहरात दिवसभर चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

SCROLL FOR NEXT