मुंबई

पूर्णेकर हत्याकांडाला नवे धागेदोरे

CD

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे
गोळीबार करणारा पवार; संशयित तरुणीचीही एसआयटीकडून कसून चौकशी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : मानपाडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे मिळू लागले आहेत. हल्ल्यात नीलेश पवार याने थेट गोळीबार केला, तर त्याचा साथीदार निखिल यादव याने पूर्णेकर यांच्यावर चॉपरने वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, हत्याकांडाच्या कटात एका तरुणीची भूमिका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम यांनी पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात संबंधित तरुणीचा उल्लेख केला आहे. घटनेच्या वेळी ती घटनास्थळाच्या परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याचा दावा जबाबात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीने गुरुवारी तिची चौकशी केली. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर तिच्या हालचाली, आरोपींशी असलेला संपर्क आणि संबंध याबाबत माहिती घेतली जात आहे.
मंगळवारी रात्री पूर्णेकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेच्या दिवशीच सुभाष ऊर्फ पप्प्या शिंदे याला अटक करण्यात आली. त्यानंतर नीलेश पवार आणि निखिल यादव यांचा माग काढत पोलिसांनी दोघांना कर्नाळा अभयारण्य परिसरातून ताब्यात घेतले.

तरुणीच्या भूमिकेचा तपास
राम पूर्णेकर यांच्या पुरवणी जबाबानुसार, काही दिवसांपूर्वी पूर्णेकर यांनी संबंधित तरुणीला दोन व्यक्तींसह एका खोलीत पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर तिचा पूर्णेकर यांच्यावर राग असल्याचेही जबाबात नमूद आहे. मात्र या दाव्याची सत्यता तसेच त्याचा हत्याकांडाशी काही संबंध आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे एसआयटीकडून संबंधित तरुणीची चौकशी करून तिचे आरोपींशी असलेले संबंध, संपर्क आणि हत्येपूर्वीच्या हालचाली तपासल्या जात आहेत. दरम्यान, संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि हेल्मेटधारी एक संशयित हल्लेखोर अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT