मुंबई

गांधींच्या रेल्वे प्रवासाचा नवा अन्वयार्थ

CD

गांधींच्या रेल्वे प्रवासाचा नवा अन्वयार्थ
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ४ : महापुरुषांकडे एका विशिष्ट चष्म्यातून पाहण्याची सवय सोडून त्यांच्या कार्यातून ‘भारत’ या अस्तित्वाचे प्रवाहीपण समजून घेण्याची गरज आहे. महात्मा गांधींच्या कार्याकडेही व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करू शकतील अशी माणसे गांधींनी घडवली, असे प्रतिपादन पत्रकार सारंग दर्शने यांनी केले. डोंबिवली पूर्वेतील बोडस सभागृहात (ता.२) लेखक गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या ‘गांधी आणि रेल्वे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी ‘रुळानुबंध’च्या चौथ्या आवृत्तीचे तसेच कन्नड अनुवादाचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक माधव जोशी होते.
गांधीजींचा रेल्वे प्रवास केवळ राजकीय नव्हता, तर त्यातून तत्कालीन जात, धर्म आणि सामाजिक भेदांच्या भिंती काही प्रमाणात दूर होण्यास मदत झाली. कोणत्याही ‘इझम’च्या चौकटीत गांधीजींकडे न पाहता त्यांचे कार्य व्यापक संदर्भात समजून घेण्याची दृष्टी ‘गांधी आणि रेल्वे’ हे पुस्तक देते, असे दर्शने यांनी सांगितले. ‘रुळानुबंध’च्या कन्नड अनुवादामुळे दोन भाषांमधील सांस्कृतिक पूल मजबूत होईल, असे उमाताई कुलकर्णी यांनी नमूद केले. अनुवादक चंद्रकांत पोकळे यांनी सुमारे २०० मराठी पुस्तकांचे कन्नडमध्ये अनुवाद केल्याची माहिती त्यांनी दिली. लेखक गणेश कुलकर्णी यांनी रेल्वेच्या माध्यमातून गांधीजी भारतीय जनतेशी कसे जोडले गेले याचा अभ्यास पुस्तकातून मांडल्याचे सांगितले. कार्यक्रमास साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : कोकणातील लोककलांना राजाश्रय मिळायला हवा; अनिकेत तटकरे

SCROLL FOR NEXT