मुंबई

नवीन पनवेल मध्ये महावितरणाचा भोंगळ कारभार!

CD

नवीन पनवेलमध्ये विजेचा खेळखंडोबा
वारंवार वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठ्यावरही परिणाम
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः नवीन पनवेल सेक्टर १३ येथील ए टाइप परिसरात महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दररोज सकाळी ६.३० वाजता आणि सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने स्थानिक रहिवाशांना भीषण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
महावितरणकडून वीज खंडित केली जाणारी हीच वेळ सिडकोच्या पाणीपुरवठ्याची असते. वीज नसल्याने पाणी खेचणे आणि भरून ठेवणे अशक्य होत असून, एकाच वेळी वीज आणि पाणी या दोन्ही मूलभूत सुविधांचा बट्ट्याबोळ झाला आहे. यामुळे दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि विशेषतः गृहिणींचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
वारंवार जळणाऱ्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या मुख्य केबलमुळे ही समस्या उद्भवत असल्याचे वायरमनकडून सांगण्यात आले. दरमहा भरमसाट वीजबिले वसुली करणाऱ्या महावितरणकडून नियमित सेवा का दिली जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनीही तातडीने लक्ष घालून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT