मुंबई

पनवेलमध्ये रोज ५८ एमएलडी पाण्याची तूट

CD

पनवेलची तहान भागणार कशी?
भरत पाटील यांनी भविष्यातील पाणी नियोजनावरून शासनाला धारेवर धरले
पनवेल, ता. ४ (बातमीदार) : पनवेल-सिडको परिसरात सध्या दररोज ५८ एमएलडी पाण्याची भीषण तूट निर्माण झालेली असतानाही नव्या बहुमजली गृहप्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर परवानग्या दिल्या जात आहेत. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन काय, असा सवाल ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी उपस्थित केला आहे. या परिस्थितीवर शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहराची सध्याची पाण्याची मागणी २६८ एमएलडी असून, प्रत्यक्षात सुमारे २१० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे दररोज ५८ एमएलडी पाण्याची तूट निर्माण होत असल्याचे भरत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. एकीकडे विद्यमान नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे पनवेल-सिडको परिसरात मोठ्या प्रमाणावर बहुमजली इमारती आणि गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पांमध्ये भविष्यात वास्तव्यास येणाऱ्या हजारो नागरिकांच्या पाण्याची गरज कशी भागविली जाणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवीन बांधकामांना परवानगी देताना भविष्यातील पाणी उपलब्धतेचा कोणता निकष वापरला जातो, भोगवटा प्रमाणपत्र देताना पुरेशा पाणीपुरवठ्याची खात्री केली जाते का आणि वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाणी मागणीची जबाबदारी कोणाची, याचा खुलासा शासनाने करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT