मुंबई

नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा राहणार बंद

CD

नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा राहणार बंद
नवी मुंबईतील सात विभागांना बसणार फटका
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबई पालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य जलवाहिन्यांवर तातडीची तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असल्याने शहरात तब्बल १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवार (ता. ६) रात्री १० वाजल्यापासून ते बुधवार (ता. ७) दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरून होणारा पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या चॅनेलवरील एम.एस. प्लेट बसविणे, नवीन मोटरींग किऑस्क बसविणे, तसेच केंद्राजवळील मोरबे मुख्य जलवाहिनीवर २०५० मि.मी. व्यासाचा जलमापक (फ्लो मीटर) बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय सीबीडी सेक्टर-७ येथे मोरबे मुख्य जलवाहिनीवर १८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह, वाशीतील अरेंजा सर्कलजवळ ७०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि महापे येथे ९०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सात विभागांवर परिणाम
या कामांमुळे बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या तसेच सायंकाळच्या वेळेतील पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT