मुंबई

सह्याद्रीच्या कुशीतील कोंडाणे लेण्यांचा श्वास मोकळा

CD

कोंडाणे लेण्यांचा परिसर स्वच्छ
स्वयंसेवकांच्या मोहिमेत ४०० किलो कचरा संकलित; मद्यसेवनावर बंदीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती तसेच राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या औचित्याने निसर्ग आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा संदेश देत ‘एनव्हायर्मेंट लाइफ फाउंडेशन’तर्फे कर्जतमधील ऐतिहासिक कोंडाणे लेणी व धबधबा परिसरात स्वच्छता मोहीम आणि मिनी ट्रेक आयोजित करण्यात आला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील संवेदनशील परिसंस्थेचे पावित्र्य जपण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५० हून अधिक स्वयंसेवक, कर्जत वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.
नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या परिसरात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचे मोहिमेदरम्यान दिसून आले. स्वयंसेवकांनी सुमारे ४०० किलो कचरा संकलित केला. त्यामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लेट्स, चमचे, रॅपर्स, पिशव्या तसेच मद्याच्या बाटल्यांचा समावेश होता. याशिवाय अंदाजे ३० हजार वैयक्तिक प्लॅस्टिकचे तुकडेही गोळा करण्यात आले. एका परिसरातूनच २० ते ३० मोठ्या गोण्यांमध्ये १०० किलोहून अधिक प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा झाल्या.

मद्यसेवनावर कारवाईची मागणी
पर्यटनस्थळांच्या होणाऱ्या दुरवस्थेबाबत फाउंडेशनच्या संस्थापकांनी चिंता व्यक्त केली. डोंगर, धबधबे आणि दऱ्यांचा काही पर्यटकांकडून खुले बार व कचराकुंडीप्रमाणे वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्लॅस्टिक वन्यजीव आणि कीटकांच्या पोटात गेल्याने त्यांच्या जीवाला तसेच अधिवासाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संवेदनशील परिसंस्था, पर्वतरांगा आणि धबधबा परिसरात मद्यसेवनावर पूर्णपणे बंदी घालून नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली.
या मोहिमेत फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य नितीश म्हात्रे, विशाल कामटकर, सोहन भोसले, संजय ऐनकर, वर्षा कुंभार, सुरेश कदम, अनिकेत गोडंबे आणि सुशील जाधव सहभागी झाले. कर्जत वन विभागाचे अधिकारी समीर शिंदे, मोहन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले. निसर्गाचा आनंद घेताना स्वतःचा कचरा स्वतःसोबत परत आणून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन पर्यटक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींना करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT