मुंबई

ठाणे स्थानकाचा मार्ग तब्बल १७ दिवस बंद

CD

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाहून टेंभी नाक्याकडे येणारे मार्ग तब्बल १७ दिवस बंद राहणार आहेत. वाहतूक विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, सुमारे तीन आठवडे परिसराला वाहतूक कोंडीचा फटका बसणार आहे. २० ऑक्टोबरपर्यंत २४ तास हे बदल राहणार आहेत.

ठाण्यातील टेंभी नाका येथे साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. उत्सवाच्या निमित्ताने येथे जत्रादेखील भरली जाते. त्यामुळे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर उत्सवाच्या काळात मोठी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी होऊ नये, याकरिता ठाणे वाहतूक विभागाने परिसरातील मार्गांवरील वाहतुकीत बदल केले आहेत. या काळात स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

प्रवेश बंद :
ठाणे स्थानक येथून टॉवर नाका तसेच दगडी शाळा चौकाच्या बाजूने वीर सावरकर रोडमार्गे टेंभी नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय, टेंभी नाका सुजय हॉटेल कट, चरई, भवानी चौक, धोबी आळी क्रॉस, फेअर अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, मीनाताई ठाकरे चौक.

पर्यायी मार्ग :
सुजय हॉटेल कट, ठाणे महापालिका शाळा क्रमांक १७ मार्ग, धोबी आळी चौक, धोबी आळी मशीद, सामान्य रुग्णालय जीपीओ, कोर्टनाका सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT