मुंबई

भिवंडी तालुक्यात १.७९ लाख मतदार बेपत्ता

CD

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पुनरावलोकन सर्वेक्षणाद्वारे मतदार यादी नियमित करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. तालुक्याच्या तीन मतदारसंघांतील मतदार याद्यांमधून सुमारे १,७९,२२८ नावे गायब असून, त्यानुसार ३०,७८० मतदारांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी अद्याप एक अर्जही दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यात आणि महापालिकासह असलेल्या क्षेत्रात तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम, तसेच वाडा तालुक्यात ६० मतदान केंद्रांचा समावेश असलेला भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या अंदाजे १०,६६,७१२ मतदारांपैकी केवळ ६,५८,९६५ मतदारांचे डिजिटायझेशन करण्यात आले असून, ४,०७,७४७ नावे वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक १,८४,६९२ नावे भिवंडी पूर्व मतदारसंघातून वगळली आहेत. पालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागांमध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या जास्त असल्याने अनेक लोकांनी शहर सोडले आहे. त्यांची नावे त्यांच्या मूळ गावाच्या मतदार यादीतही समाविष्ट होती. यापैकी ३७,२४६ नावे दोनदा वगळण्यात आली, म्हणजेच १,५०,५१७ मतदार वगळण्यात आले होते.

मतदारांमध्ये चिंतेचे वातावरण
विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून मतदारांची नावे वगळल्याने बहुतांश मतदारांमध्ये चिंता वाढली असून, यादी तपासण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


विधानसभा मतदारसंघ नावे नोंदणीकृत वगळलेली नावे
भिवंडी पूर्व १,९१,४४६ ८४,६९२
भिवंडी पश्चिम १,९१,६८९ १,५५,०००
भिवंडी ग्रामीण २,७५,८३० ६७,९७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT