मुंबई

पद्मदुर्ग निधीचा मार्ग मोकळा

CD

पद्मदुर्ग निधीचा मार्ग मोकळा
तटकरे यांच्या निर्देशानंतर दोन कोटी रुपये पुरातत्त्व विभागाकडे वर्ग होणार
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंजूर करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व खात्याकडे वर्ग करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजूर निधी तांत्रिक अडचणींमुळे रखडला होता. याबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मुरूड शहराच्या पश्चिमेस अरबी समुद्रात असलेला पद्मदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि स्वराज्याच्या आरमारशक्तीचा महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे. सुमारे नऊ एकर परिसरात पसरलेल्या या जलदुर्गाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्याच्या संवर्धनाची कामे रखडली आहेत. किल्ल्याच्या पाहणीदरम्यान खासदार तटकरे यांनी संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
नुकत्याच झालेल्या बैठकीत निधी पुरातत्व खात्याकडे वर्ग न होण्यामागील कारणांची तटकरे यांनी विचारणा केली. तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपये पुरातत्त्व खात्यास वर्ग करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पर्यटक सुविधांवरही भर
मुरूड येथे दरवर्षी लाखो पर्यटक जंजिरा किल्ल्याला भेट देतात. त्यांना पद्मदुर्ग किल्लाही सहज पाहता यावा, यासाठी त्याची डागडुजी आवश्यक असल्याचे तटकरे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी लवकरच पुरातत्त्व खात्यास वर्ग होऊन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पद्मदुर्गवर पर्यटकांना सहज चढता-उतरता यावे, यासाठी मांडवा बंदरावरील तरंगत्या जेट्टीसाठी आवश्यक वाढीव निधीची पूर्तताही लवकर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT