मुंबई

खुटेगान पाड्यात वीज पोहोचली

CD

खुटेगान पाड्यात वीज पोहोचली
सात दशकांची प्रतीक्षा संपली; ३६ वाड्यांना रस्त्याने जोडण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : स्वातंत्र्यानंतर तब्बल सात दशके उलटूनही विजेपासून वंचित असलेल्या अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ग्रामपंचायतीअंतर्गत खुटेगान आदिवासी पाड्यात अखेर वीज पोहोचली. आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून पाड्यातील प्रत्येक घरात वीजपुरवठा सुरू झाल्याने खुटेगान विद्युत रोषणाईने उजळून निघाले. वीज मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
खुटेगान हा दुर्गम भाग असून, येथे सुमारे ५० लोकवस्ती आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वीजपुरवठ्याची समस्या आता दूर झाली आहे. या कामासाठी ६० उच्चदाब व १३ लघुदाब वीजखांब, सुमारे तीन किलोमीटर मुख्य वीजवाहिनी आणि आठ मीटरचे वीजखांब उभारण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नमित नाईक यांनी दिली. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात कामासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आदिवासी परंपरेनुसार सत्कार करण्यात आला.
या वेळी आमदार महेंद्र दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, कामगार नेते दीपक रानवडे, ॲड. विलास नाईक, कार्यकारी अभियंता राजेश भगत, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र तावडे, ग्रामपंचायत सदस्य तुषार शेरमकर आणि कंत्राटदार शुभम पोटे यांचा सत्कार करण्यात आला.

३६ पाड्यांसाठी रस्त्यांचे आश्वासन
अलिबाग तालुक्यातील ३६ आदिवासी पाडे अद्याप रस्त्याने जोडले गेलेले नाहीत. वन विभागाच्या हरकती आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे येथे पक्के रस्ते पोहोचलेले नाहीत. ही अडचण भविष्यात दूर करून दुर्गम भागांना रस्त्याने जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार दळवी यांनी दिली. रस्त्याअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
ॲड. विलास नाईक यांनी विकासकामांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. राजा केणी यांनी तुषार शेरमकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. दिलीप भोईर यांनी मागील ४७ वर्षांच्या सत्ताकाळात आदिवासी, ठाकूर, कातकरी आणि कोळी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT