मुंबई

कर्नाळा खिंडीत लोखंडी पाईप

CD

कर्नाळा खिंडीत लोखंडी पाइप
ट्रक कठड्यावर आदळला; भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ ठप्प
नवीन पनवेल, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंड परिसरात ट्रकचा अपघात होऊन त्यातील लोखंडी पाइप आणि पत्रे रस्त्यावर कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गाच्या संरक्षण कठड्याला धडकला आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने वळला. शासकीय सुट्टी असल्याने परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ होती, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी पाइप तसेच संरक्षणासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पत्रे होते. ट्रकचा तोल गेल्यानंतर हे साहित्य संरक्षण कठडा तोडून खाली कोसळले. त्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्याकडून महामार्गावर येणाऱ्या भुयारी मार्गाजवळ मोठ्या प्रमाणात लोखंडी पाइप आणि इतर साहित्य विखुरले. यामुळे भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली.
अवजड वाहनांचे नियंत्रण सुटून साहित्य महामार्गावर कोसळण्याच्या घटना वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. कर्नाळा खिंड आणि भुयारी मार्ग परिसरात रिक्षांची होणारी गर्दी तसेच अवजड वाहनांच्या हालचालींवर संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून होत आहे.

रिक्षांच्या थांब्याने धोका
भुयारी मार्गाच्या परिसरात अनेक रिक्षाचालक वाहने उभी करतात. अपघाताच्या वेळी या ठिकाणी रिक्षा किंवा प्रवासी उपस्थित असते, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने कोणतेही वाहन अथवा नागरिक लोखंडी पाइपच्या थेट आघातात आले नाहीत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर पडलेले पाईप व इतर साहित्य हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT