मुंबई

नवी मुंबई विमानतळावर लँडिंग फीवर १००% सवलत

CD

नवी मुंबई विमानतळावर लँडिंग फी १०० टक्के माफ
आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कॅश व्हाउचर; मुंबई विमानतळावरील टी-१चा पुनर्विकास
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : मुंबई विमानतळावरील टी-१च्या पुनर्विकासादरम्यान विमान कंपन्यांना काही सेवा नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करता येणार आहेत. नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लँडिंग फी १०० टक्के माफ केली जाणार असून, प्रवाशांना कॅश व्हाउचरही मिळणार आहेत.

अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल)द्वारे संचलित मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने मुंबई विमानतळावरील ६० वर्षे जुन्या टर्मिनल-१च्या (टी-१) उत्तर भागाचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विमान वाहतुकीतील सातत्य कायम ठेवण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान कंपन्यांना त्यांचे काही कामकाज तात्पुरते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या स्थलांतराला प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई विमानतळावर नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लँडिंग फीवर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांवरील युझर डेव्हलपमेंट फीमधील फरक भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कॅश व्हाउचर देण्याची योजनाही आखण्यात आली आहे.

९१ टक्के वाहतूक सुरळीत राहणार
पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात टी-१च्या क्षमतेपैकी केवळ एक तृतीयांश भागाचे पाडकाम केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ९१ टक्के प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरळीत राहणार असल्याचे एएएचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले. नवी मुंबई विमानतळावर होणारे स्थलांतर पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाचे असेल. त्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतुकीत हा कायमस्वरूपी बदल नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टी-१च्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्यानंतर टी-१ची वार्षिक प्रवासी क्षमता १५ दशलक्षांवरून ३३ टक्क्यांनी वाढून २० दशलक्ष प्रवासी प्रतिवर्ष इतकी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT