घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : मोटारसायकलवरून येऊन नागरिकांना धक्का देत सोन्याचे मंगळसूत्र जबरीने लुटणाऱ्या दोन सराईत संशयितांना पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, दोन मोटार वाहनांसह एकूण पाच लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी महिला फिर्यादीला धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे २२ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून नेले होते. या प्रकरणी पार्कसाईट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पार्कसाईट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सावंत, निरीक्षक (गुन्हे) अशोक लांडगे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक नितीन झाडे, अतुल ठोंबरे, तसेच गुंडाविरोधी पथकाचे उपनिरीक्षक अक्षय वाघ, वाल्मिक शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळ, एल.बी.एस. मार्ग तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शुभम सुखराम चौधरी (वय २७) आणि अजय ऊर्फ डब्ल्यू मुन्नीलाल गुप्ता (२८, दोघेही रा. अँटॉप हिल, मुंबई) यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासातून पार्कसाईट पोलिस ठाण्यातील दोन, तसेच भांडुप आणि घाटकोपर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एका अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.