सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : प्रस्तावित अंतर्गत रिंग मेट्रोच्या कामासाठी ठाण्यात वृक्षतोड सुरू झाल्याने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांचा संघर्ष आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. झाडे वाचवण्यासाठी गरज पडल्यास झाडांना मिठी मारून ‘चिपको आंदोलन’ करण्याचा इशारा ‘ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो’ या नागरिक मंचने दिला आहे. दरम्यान, वृक्षतोड सुरू असताना नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याचा दावा करत मंचने कासारवडवली पोलिस ठाण्यात त्यांच्या ‘बेपत्ता’ असल्याची प्रतीकात्मक तक्रारही दिली.
रिंग मेट्रोच्या मार्गाबाबत नागरिकांकडून यापूर्वीही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मात्र आता प्रत्यक्ष वृक्षतोड सुरू झाल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याची भूमिका मंचने घेतली आहे. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा आणि वृक्षतोडीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी मंचने केली आहे. मंचच्या संयोजक अॅड. राधिका राणे यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. पाच वर्षांतून एकदा निवडणुकीपुरते दारात येऊन मते मागणे एवढीच लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही. निवडून दिल्यानंतर जनतेचे प्रश्न मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ठाणेकरांच्या हरकतींकडे दुर्लक्ष करून वृक्षतोड सुरू असताना लोकप्रतिनिधी नागरिकांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रतीकात्मक ‘बेपत्ता तक्रार’ पोलिस ठाण्यात दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
झाडांना मिठी मारून आंदोलन
अनेक दशकांपासून ठाण्यात राहताना शहराचा झालेला बदल पाहिला आहे. हिरवेगार शहर वृक्षतोडीमुळे बदलताना पाहणे वेदनादायी आहे. ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि तरुण या विषयावर चर्चा करण्याची मागणी करीत आहेत. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेतले नाही, तर झाडांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू. गरज पडल्यास झाडांना मिठी मारून ‘चिपको आंदोलन’ करू, असे निवृत्त शिक्षिका अरुणा नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.