वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : पोलिस भरती, तसेच भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका कुटुंबाकडून ऑनलाइन पद्धतीने १० लाख ३० हजार रुपये घेतल्याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज पाटील (रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराची मुलगी दामिनी तायडे ही कल्याण स्थानक परिसरातील प्रहार अकादमीत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होती. त्यावेळी तेथील शिक्षक असल्याचे सांगणाऱ्या सूरजने तक्रारदाराशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला. त्यानंतर दामिनीला पोलिस भरतीत, तर मुलगा भावेशला भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने पाटील याला ऑनलाइन पद्धतीने एकूण १० लाख ३० हजार रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर दोघांनाही नोकरी मिळवून दिली नाही. तसेच रक्कमही परत केली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी या रकमेचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी १ ऑक्टोबरला रात्री ९.१९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोरे व सायबर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.