मुंबई

आगरी-कोळी भूमिपुत्रांची मागणी

CD

पूर्णेकर हत्या प्रकरण

हत्येच्या तपासाला वेग द्या
आगरी-कोळी भूमिपुत्रांचा इशारा; १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग देऊन मारेकऱ्यांसह सूत्रधारांना तातडीने अटक करावी, अशी मागणी आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या विविध संघटनांनी केली. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला.

न्यायाच्या मागणीसाठी कल्याण, भिवंडी आणि ठाणे परिसरातील आगरी-कोळी समाजबांधव रविवारी (ता.४) ठाण्यात एकवटले. आगरी सेना महाराष्ट्र, २७ गाव संघर्ष समिती, नवी मुंबई विमानतळ संघर्ष समिती, शेतकरी संघटना अंजुर-दिवे आणि आगरी-कोळी उत्कर्ष मंडळ कल्याण यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी गणेशनगर येथील पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून या लढ्यात साथ देण्याचे आश्वासन दिले.

न्याय मिळेपर्यंत लढा
पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आगरी-कोळी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील. न्याय न मिळाल्यास भूमिपुत्रांच्या वतीने तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा शिवसेनेच्या माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी दिला. आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या संघटनांना पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोमवारी (ता. ५) भेटीसाठी वेळ दिली आहे. तपासाला गती देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे आगरी-कोळी उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT