‘उलगुलान’ ठाण्याच्या वेशीवर
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर ४८ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या सकल आदिवासी विद्यार्थी संघटनांचा मोर्चा रविवारी सायंकाळी (ता. ४) ठाण्याच्या वेशीवर पोहोचला. २८ सप्टेंबरपासून नाशिक ते राजभवन मुंबई येथेपर्यंत सुरू केलेला ‘उलगुलान पायी मोर्चा’ भिवंडी तालुक्यातील येवई नाका येथे दाखल झाला आहे.
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये मागील दोन वर्षांत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला आदिवासी विकास मंत्रालय जबाबदार असून, गडचिरोली येथे सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी तसेच आश्रमशाळांमध्ये जेवण बनवण्याची परवानगी देऊन सेंट्रल किचन बंद करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव इतर प्रशासनातील अधिकारी यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात, अशी मागणी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अरुण पावरा यांनी केली आहे.
गेंड्याच्या कातडीचे सरकार!
‘आम्ही ४८ दिवस आंदोलन करूनही गेंड्याच्या कातडीचे सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, परंतु आता आमचा समाज सुशिक्षित होत आहे आणि समाजातील ‘जेन-झी’ हा वर्ग आता रस्त्यावर उतरला असून, आता सरकारच्या छाताडावर बसून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ तोपर्यंत मुंबई सोडणार नाही,’ असा निर्धार आंदोलनकर्त्या धनश्री पराडके या तरुणीने या वेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.