पूर्णेकर हत्या प्रकरण
पाचवा आरोपी कोण?
हत्येचा तपास वेगात; आरोपी पप्प्या शिंदेची दुचाकी जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणातील हेल्मेटधारी पाचवा आरोपी हा फरार संतोष ऊर्फ टल्ली कनोजिया याचा साथीदार असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे कनोजिया पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पाचव्या आरोपीची ओळख आणि हत्येतील त्याची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी अटकेतील सतीश ऊर्फ पप्प्या शिंदे याची दुचाकी जप्त केली आहे.
मानपाडा परिसरातील कार्यालयात मंगळवारी (ता. २९) रात्री पूर्णेकर यांच्यावर पाच जणांनी हल्ला केला होता. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सतीश ऊर्फ पप्प्या शिंदे, निखिल यादव आणि निकेश पवार या तिघांना अटक केली. संतोष ऊर्फ टल्ली कनोजियासह आणखी एक संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. अटकेतील निकेश पवार याच्यावर यापूर्वी खून आणि खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. आरोपींच्या संपर्कातील व्यक्ती आणि अन्य संशयितांचीही चौकशी सुरू आहे. पूर्णेकर यांच्या हत्येच्या वेळी हेल्मेट घातलेल्या पाचव्या आरोपीची अद्याप ओळख पटलेली नाही; मात्र तो कनोजिया याचा साथीदार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे कनोजियाच्या अटकेनंतर या आरोपीची ओळख, त्याचा संबंध आणि हत्येतील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
--
सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार
पूर्णेकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सतीश ऊर्फ पप्प्या शिंदेला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासासाठी पोलिसांकडून त्याच्या आणखी पोलिस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.