मुंबई

वन्यजीव संवर्धनासाठी पाच किलोमीटर दौड

CD

मुरबाड, ता. ४ (वार्ताहर) : वन्यजीव सप्ताहानिमित्त (२ ते ८ ऑक्टोबर) ‘जुळले अधिवास, समृद्ध वन्यजीव’ या संकल्पनेवर आधारित ‘वन्यजीवांसाठी धाव’ हा जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. जीवनदीप महाविद्यालय, गोवेली ते गणेश मंदिर, टिटवाळा या मार्गावर पाच किलोमीटरची दौड घेण्यात आली. या उपक्रमात राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी व स्वयंसेवकांसह १५० हून अधिक नागरिक सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. आमदार किसन कथोरे यांचे मार्गदर्शन लाभले. जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, कल्याण वन विभागाचे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, वनपाल व वनरक्षक, कल्याण ग्रामीण भाजप अध्यक्ष शेखर लोणे; तसेच मानद वन्यजीव रक्षक प्रेम आहेर उपस्थित होते. वाइल्ड इंडिया ०५ फाउंडेशन, डब्ल्यूएआरआर स्वयंसेवी संस्था, जीवनदीप महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्रसेना विभाग; तसेच गणपती मंदिर, टिटवाळा ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. फलक, बॅनर व घोषणांच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धन, अधिवास संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा संदेश देण्यात आला. दौडीनंतर गणेश मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना जैवविविधता व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT