मुंबई

डॉक्टर मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रेंसह चौघे शरण

CD

डॉक्टर मारहाणप्रकरणी रमेश म्हात्रेसह चौघे शरण
जामीन रद्द; आधारवाडी कारागृहात रवानगी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यासह त्यांच्या तीन साथीदारांनी रविवारी (ता. ४) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. चौघांनी कल्याण न्यायालयात हजेरी लावली. चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली.
रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे हे चौघे रविवारी कल्याण न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश संतोष आगे यांनी चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी चौघांना आधारवाडी कारागृहात दाखल केले. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला आव्हान देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा जामीन देण्याचा आदेश रद्द केला. तसेच म्हात्रे याच्यासह चौघांना तीन दिवसांच्या आत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला होता. त्यानुसार म्हात्रे याच्यासह चौघांनी रविवारी (ता. ४) पोलिसांसमोर शरण येत न्यायालयात हजेरी लावली. जामीन रद्द झाल्यानंतर आता चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT