गोव्यात कारच्या धडकेत ठाण्यातील महिलेचा मृत्यू
सकाळ न्यूज नेटवर्क
म्हापसा, ता. ४ : कोलवाळ येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर घोटणेश्वर मंदिरासमोर शनिवारी (ता. ३) सायंकाळी एका भरधाव कारने स्कूटरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ठाण्यातील एका ३६ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला, तर तिचे पती आणि मुलगी जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारावाडा-म्हापसा येथून पेडण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने स्कूटरला धडक दिली. या वेळी कारचालक डेव्हिड गॅब्रिएल मोहिते (वय ३६ रा. मिरज, सांगली) हा मद्याच्या नशेत तसेच वैध वाहन परवाना नसताना निष्काळजीने गाडी चालवीत असल्याचे उघड झाले. डेव्हिडने पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी समोरील स्कूटरीला पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत स्कूटरवर पाठीमागे बसलेल्या आकांक्षा भन्साळी (वय ३६, रा. भाईंदर पश्चिम, ठाणे) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात स्कूटरचालक कल्पेश जैन आणि त्यांची मुलगी हे दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोलवाळ पोलिस ठाण्यात आरोपी कारचालक डेव्हिड मोहिते याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.