मुंबई

सर्वोदय नगरमध्ये उंदीर-घुशींच्या बंदोबस्तासाठी पिंजरे

CD

सर्वोदयनगरमध्ये उंदीर-घुशींच्या बंदोबस्तासाठी पिंजरे
कीटकनाशक विभागाची तातडीने कारवाई
जोगेश्‍वरी, ता. ५ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदयनगर परिसरातील एम.एच.बी. कॉलनी क्रमांक १५, १६, १७ आणि २० येथे उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘सर्वोदयनगरमध्ये उंदीर-घुशींचा हैदोस’ या आशयाची बातमी २ ऑक्टोबरच्‍या अंकात प्रकाशित झाली होती. या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या के-पूर्व विभागाच्या कीटकनाशक विभागाने तातडीने कारवाई केली आहे.
कीटकनाशक विभागाच्या मुषक नाशक पथकाने परिसरात विशेष मोहीम राबवून सुमारे ६० ते ७० उंदीर मारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चाळ क्रमांक १७ आणि २० मधील भूमिगत गटारांमध्ये तसेच रस्त्यावरील इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्सच्या खाली व आजूबाजूच्या परिसरात उंदीर नियंत्रणासाठी औषध टाकण्यात आले. आता मुषक नाशक विभागाकडून उंदीर पकडण्यासाठी पिंजरेही लावण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, मात्र उंदीर आणि घुशींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी नियमितपणे औषध फवारणी व औषध टाकण्याबरोबरच पिंजरे लावून कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पालिकेचे अधिकारी श्याम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक राजेश खुराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. परिसरात उंदीर नियंत्रणासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुढील काळातही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भूमिगत गटारे, रस्त्यालगतचे भाग तसेच इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्सच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उंदीर व घुशींचा वावर असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. ‘सकाळ’ने नागरिकांच्या समस्येला वाचा फोडल्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT