भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : युवक-युवतींना विचारमंच उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समता संघर्ष संघटन आणि समता संघर्ष संघटन सांस्कृतिक मंचातर्फे ‘रेनी कार्निवल- संवाद तरुणाईचा’ हा कार्यक्रम पडघा-पाच्छापूर येथे रविवारी उत्साहात झाला. कार्यक्रमात ‘संसद संवाद’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. युवक आणि विद्यार्थ्यांनी गाणी, कविता, ध्वनिमुद्रित संवाद आणि चर्चात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुण सादर केले.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर आधारित या कार्यक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक शैलेश दोंदे होते. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिका आशालता कांबळे, उत्तम जोगदंड, कवयित्री सुरेखा पैठणे, कल्याण बार कौन्सिलचे अध्यक्ष प्रकाश जगताप आणि महेंद्र उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ‘संसद संवाद’ या अभिनव उपक्रमात सहभागी युवकांनी विविध विषयांवर मते मांडली. युवकांमध्ये सामाजिक आणि वैचारिक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सायंकाळच्या सत्रात कवी संमेलन झाले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या विचारांवर आधारित सामाजिक चळवळीला युवकांनी सक्रियपणे पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.