मुंबई

श्रमजीवींचा मुंबईत महामोर्चा

CD

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आणि विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे २७ ऑक्टोबरला मुंबईत ‘संविधान हक्क संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. भिवंडीजवळील हायवे-दिवे येथील महिफल गार्डन ढाबा येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून, ठाणेमार्गे मंत्रालयावर धडक देण्यात येणार आहे. या मोर्चात एक लाखाहून अधिक श्रमजीवी, आदिवासी तसेच श्रमजीवी विद्यार्थी संघटनेचे युवक-युवती सहभागी होणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमध्ये संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावांत जाऊन जनजागृती करीत आहेत. ‘सरकारा, सांगा कसं जगायचं?’ असा सवाल उपस्थित करत नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा उभारण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित, संस्थापिका विद्युल्लता पंडित आणि अध्यक्ष सीता घाटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाची तयारी सुरू आहे.


शिक्षण, रोजगारावरही भर
तीन ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांची रिक्त पदे भरणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत उपचार, कुळ कायद्यान्वये जमिनी आदिवासींच्या नावे करणे, रोजगार हमी योजनेत मागेल त्याला काम व वेळेवर मजुरी देणे, तसेच महापालिका आणि कंपनी क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेणे व विमा संरक्षणाची मर्यादा ३५ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणीही करण्यात येणार आहे. आपल्या आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी या संघर्षात एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांनी केले आहे.

वनजमिनींच्या दाव्यांचा निपटारा करा
वनजमिनींच्या दाव्यांचा १५ डिसेंबरपर्यंत निपटारा करून पात्र आदिवासींना वनपट्टे देणे, जन्मनोंदणी व आधार कार्डासाठी स्थानिक पुरावे ग्राह्य धरणे, गरीबांच्या घरांची नोंद सातबारा उताऱ्यावर करून गावठाणाचा विस्तार करणे आणि जलजीवन मिशनद्वारे वर्षभर पुरेसा नळपाणीपुरवठा करणे, या प्रमुख मागण्या मोर्चातून मांडल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT