मुंबई

जिल्ह्यातील ८० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

CD

मुरबाड, ता. ५ (वार्ताहर) : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा माधवबाग संस्थेतर्फे ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. खोपोली येथील माधवबाग केंद्रात झालेल्या सोहळ्यात जिल्ह्यातील ८० शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. त्यात मुरबाडमधील आठ शिक्षकांचा समावेश आहे.
मुरबाड तालुक्यातील धनाजी दळवी, मनीषा देसले, दौलत भावार्थ, जयेश गोडांबे, भालचंद्र कुरले, धनाजी पवार, राजेश पाटील आणि संदेश गोडांबे यांना सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक जनजागृती, निरोगी जीवनशैली आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी माधवबाग व्यवस्थापन आणि महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माधवबागचे सीएसआर प्रमुख डॉ. भालचंद्र सरदार, बाह्यरुग्ण विभाग प्रमुख डॉ. दीपाली देशमुख, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील, मुंबई विभाग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय किरपण, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी दळवी, वसंत जोहरे, कोकण विभाग शिक्षक परिषदेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, प्रवीण लोंढे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT