मुंबई

एक हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

CD

वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनविकास महाभियान आणि रेड स्वस्तिक सोसायटी, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने; तसेच वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल, वज्रेश्वरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शनिवारी झालेल्या या शिबिरात एक हजार विद्यार्थ्यांची आरोग्य, रक्तगट, सिकलसेल ॲनिमिया आणि फेरीटिन तपासणी करण्यात आली.
गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल माध्यमांचा वापर करताना सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्यासोबतच व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त समाजनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी क्रिश कालिदास पाटील याचा सतीश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जनविकास महाभियानचे मुख्य संयोजक संतोष भोईर, रेड स्वस्तिक सोसायटीचे डॉ. प्रमोद नांदगावकर, वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर, दिलीप पाटील, अरुण पाटील, गुरुनाथ घरत, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विष्णू भामेरे, पर्यवेक्षिका विनया गायकवाड आदी उपस्थित होते. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT