मुंबई

राजकीय राड्याची महापौरांना धास्ती?

CD

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेतील भाजप-शिवसेना सत्तासंघर्षाची धग आता थेट महापौरांच्या जनता दरबारापर्यंत पोहोचली आहे. आरोप-प्रत्यारोप, आक्रमक इशारे आणि मागील जनता दरबारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापौर अश्विनी निकम यांचा सोमवारी नियोजित जनता दरबार ऐनवेळी रद्द करण्यात आला. संभाव्य राजकीय गोंधळाच्या धास्तीनेच दरबार टाळल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला पोहोचलेला असतानाच महापौर अश्विनी निकम यांचा सोमवारी प्रभाग समिती क्रमांक तीन येथे होणारा जनता दरबार ऐनवेळी रद्द करण्यात आला. पालिका प्रशासनाने दरबार पुढे ढकलल्याचे सांगितले असले, तरी त्यामागील ठोस कारण स्पष्ट केलेले नाही. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून दोन्ही पक्षांतील वाद चिघळल्यानंतर भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. त्यानंतर महापौरांचे पती कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांवर केलेल्या आरोपांमुळे संघर्ष आणखी तीव्र झाला. भाजप पदाधिकाऱ्यांकडूनही आक्रमक इशारे देण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यापूर्वीच्या जनता दरबारात स्वीकृत नगरसेवक राजेंद्र ऊर्फ बाळा श्रीखंडे आणि कपिल अडसूळ यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळे पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू नये आणि संभाव्य गोंधळ टाळता यावा, यासाठीच जनता दरबार रद्द केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT