मुंबई

ठाण्यात वेगवेगळे तीन अपघात

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : शहर परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या तीन अपघातांत एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले आहेत. खोपट बस डेपोजवळ एसटीची धडक बसल्याने ८४ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. गोटेघर येथे भरधाव वाहनाच्या धडकेत २८ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू, तर खोपट परिसरात कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने एक जण जखमी झाला.

खोपट बस डेपोजवळ रविवारी (ता. ४) सकाळी सुरेश केशव जोशी (वय ८४) हे डेपोचे गेट ओलांडून जात असताना बसने त्यांना धडक दिली. बसचे चाक त्यांच्या डाव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणात बसचालक संतोष काशीराम दुधकर यांच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोटेघर हद्दीतील पनवेल-मुंब्रा महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोलपंपासमोर आज (ता. ५) पहाटे २८ वर्षीय जयकिशन छोटेलाल यादव हा तरुण जखमी अवस्थेत आढळला. त्याचे डोके, नाक आणि कानातून रक्तस्राव होत होता. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविला. तिसऱ्या घटनेत ३० सप्टेंबरला खोपट परिसरात कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने दौलत शांताराम तळेकर जखमी झाले. ते दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे जात असताना कॅडबरी जंक्शन ते खोपट सिग्नलदरम्यान कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT