मुंबई

आदिवासी विद्यार्थ्यांची मुंबईत धरपकड

CD

आदिवासी विद्यार्थ्यांची मुंबईत धरपकड
गुन्हेगारांसारखी वागणूक; विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : नाशिकमधून मुंबईला लाँग मार्च करत आदिवासी विद्यार्थी आले, त्या वेळी त्यांच्यासोबत पोलिसही होते, पण मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड केली. दादर येथील टिळक भवन व आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती, परंतु रात्री अचानक पोलिसांनी कारवाई केली. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केल्याचा आरोप ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी केला.


टिळक भवन येथे सागर साळुंके यांनी सांगितले की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती आधीच दिली होती. नाशिकहून मुंबईपर्यंत हे विद्यार्थी आले, पण आंदोलनाची परवानगी मागण्यास गेले असता त्यांना परवानगी नाकारली. या विद्यार्थ्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या विद्यार्थ्यांची टिळक भवन व मुंबई काँग्रेस कार्यालयात राहण्याची व्यवस्था केली होती. रात्री अचानक पोलिसांनी धाडसत्र सुरू केले. नवी मुंबईत काही जणांना ताब्यात घेतले, काही मुलामुलींना मारहाण करण्यात आली, एक विद्यार्थी बेशुद्ध पडला, काहींना भिवंडीला सोडून दिले. मुंबई काँग्रेस कार्यालयात झोपलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी उठवले, त्यांना यलो गेट पोलिस ठाण्यात घेऊन गेले, दादरमधून काहींना उचलून नेले. पोलिसांनी एखाद्या आरोपीसारखे ताब्यात घेतले, काँग्रेस कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले. सुरुवातीला दादर पोलिस ठाण्यात घेऊन गेले, नंतर चुनाभट्टी व शेवटी कोपरी पोलिस ठाण्याला घेऊन गेले. काँग्रेस नेत्यांनी पोलिसांशी सातत्याने संपर्क साधल्यानंतर काहींना सोडून देण्यात आले.’ ‘मुंबईत आमची राहण्याची सोय नाही, हॉटेलमध्ये राहण्याएवढे पैसे नाहीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था केली म्हणून काँग्रेस कार्यालयात आलो, मुख्यमंत्री महोदयांनी राहण्याची व्यवस्था केली असती, तर तिकडे गेलो असतो, असेही एका विद्यार्थ्याने सांगितले.

मुंबई ‘एसएसयुआय’चे अध्यक्ष प्रद्युम यादव म्हणाले की, पोलिसांनी विद्यार्थी व मला जबरदस्तीने उचलून नेले. आधी दादर पोलिस ठाण्याला नेले, दादरमधून चुनाभट्टी पोलिस ठाण्यात पोहोचवले, वेगवेगळ्या व्हॅनमधून घेऊन गेले, पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली.


पोलिसांनी काही सहकाऱ्यांना रस्त्यातूनच ताब्यात घेतले. टिळक भवनमध्ये अंघोळ करून बाहेर येत असतानाच बाथरूममधून पोलिसांनी ताब्यात घेतले, कुठे जायचे हे ते सांगत नव्हते, पोलिस धमकावत होते. कोपरी पोलिस ठाण्याला घेऊन गेले, काँग्रेस नेत्यांचा फोन आल्यानंतर शेवटी सोडले. नाहीतर नाशिकला सोडणार होते.
- आंदोलक विद्यार्थी

पोलिसांनी आम्हाला वॉशरूमलाही जाऊ दिले नाही, पाणीही दिले नाही. आमच्याबरोबर पोलिस व्हॅनमध्ये एकही महिला पोलिस कर्मचारी नव्हती. आंदोलनस्थळी घेऊन जातो, असे खोटे सांगितले. आश्रमशाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, जेवण निकृष्ट दर्जाचे असते, आरोग्याच्या सुविधा नाहीत, सरकारकडे सातत्याने मागण्या करूनही केवळ आश्वासन दिले.
- आंदोलक विद्यार्थी

....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT