मुंबई

''कागदावरचा एसआरए आता प्रत्यक्षात!''

CD

कागदावरचा एसआरए आता प्रत्यक्षात!
बेलापूरमध्ये ४५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : शहरातील झोपडपट्टीवासीयांच्या आयुष्यात लवकरच नवा आशेचा किरण उजाडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ कागदावर आणि आश्वासनांमध्येच अडकून पडलेली एसआरए योजना आता प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. बेलापूर येथील पंचशीलनगर, दुर्गामातानगरात राहणाऱ्या नागरिकांना लवकरच त्यांच्या हक्काची आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त घरे मिळणार आहेत. या नव्या घरांची रूपरेषा, इमारतीची रचना आणि मिळणाऱ्या सोयी-सुविधांची सविस्तर माहिती डिजिटल सादरीकरणाद्वारे लाभार्थ्यांना दाखवण्यात आली. पडद्यावर आपल्या स्वप्नातील नवे घर प्रत्यक्ष साकारताना पाहून उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
बेलापूर क्षेत्रातील पंचशीलनगर येथे, बेलापूर स्मशानभूमीलगत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. याअंतर्गत एकूण ४५० कुटुंबांना ३०० चौरस फुटांची हक्काची घरे दिली जाणार आहेत. यासाठी चार उत्तुंग टॉवर उभारले जाणार असून, त्यात सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. योजनेची पुढील टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आणि बांधकामाचे स्वरूप लाभार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. पंचशीलनगर १ आणि २ यांना बेलापूर येथील स्मशानभूमीजवळ पाठीमागे राज्य सरकार जागा देणार आहे. सरकारने त्याला मंजुरी दिली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. नवी मुंबईच्या इतिहासात या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी ऐरोलीतील चिंचपाडा येथे पहिला एसआरए प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विविध तांत्रिक प्रश्न, स्थानिक अडचणी आणि निविदा प्रक्रियेतील त्रुटींमुळे तो प्रकल्प बारगळला होता. त्यामुळे नवी मुंबईत एसआरए योजना ही केवळ निविदा आणि कागदपत्रांपुरतीच मर्यादित राहते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु आमदार मंदा म्हात्रे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत प्रशासकीय अडथळे दूर करून हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावला आहे. नवी मुंबईतील हा पहिलाच प्रत्यक्षात उतरणारा एसआरए प्रकल्प ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा भूमिपूजन सोहळा लवकरच पार पडणार आहे.

आम्ही फक्त बोलत नाही, तर प्रत्यक्षात काम करून दाखवतो. सामान्य माणसाच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. बेलापूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी युक्त घर मिळावे, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत होतो. एसआरए योजनेच्या माध्यमातून साकार होणारी ही नवीन घरे लाभार्थ्यांच्या जीवनात स्थैर्य, सुरक्षितता आणि नवा आत्मविश्वास घेऊन येतील.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT