मुंबई

केंद्राच्या रेल्वे स्थायी समितीवर खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती

CD

केंद्राच्या रेल्वे स्थायी समितीवर
खासदार नरेश म्हस्के नियुक्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या ध्येय-धोरणांवर, अर्थसंकल्पावर आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचा समावेश असलेल्या विविध स्थायी समित्या स्थापन केल्या जातात. त्यानुसार केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या रेल्वेविषयक स्थायी समितीवर खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती झाली आहे.

देशातील विकासाच्या महत्त्वाच्या विषयांवर समितीत चर्चा करून आवश्यक सूचना व निर्णय प्रक्रियेत योगदान दिले जाते. यावर्षी खासदार नरेश म्हस्के यांना रेल्वेच्या स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ खासदार सुधीर गुप्ता आहेत. यापूर्वी नरेश म्हस्के यांना नगरविकास आणि गृहनिर्माण समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर वक्फ सुधारणा विधेयक, कंपनी कायदा सुधारणा विधेयक तसेच आता परदेशी देणगी (अधिनियम) सुधारणा एफसीआरए या कायदा बनविण्याऱ्या संयुक्त संसदीय समितीवर, दळवळण मंत्रालयातील हिंदी भाषा सुरक्षा समितीवरही नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
----------
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील रेल्वेच्या सल्लागार समितीमध्येही नरेश म्हस्के हे काम करीत आहेत. तसेच आता स्थायी समितीवरही काम करण्याची संधी या वेळी देण्यात आली आहे. माझ्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेशी संबंधित प्रश्न आणि विकासकामे प्रभावीपणे मांडण्यासाठी एक मोठं व्यासपीठ ठरणार आहे.
- नरेश म्हस्के, खासदार
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Arul Vignesh : सत्ताधारी आमदाराकडून महिला जिल्हाधिकाऱ्याला अश्लील मॅसेज, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

W,W,W,W! महाराष्ट्राची डबल हॅटट्रिक; भिवंडीच्या विवेक शेलारची भन्नाट गोलंदाजी, टेनिस बॉल क्रिकेटचा नायक, SMATमध्ये चमकला

IFFI 2026: ‘इफ्फी’च्या कोकणी चित्रपट विभागात लघुपटांसह १२ चित्रपटांचा समावेश; गोव्यातील तरुण सर्जनशीलतेचा ‘लघु’अविष्कार

Latest Marathi News Update : मेट्रो स्थानकाचं नाव 'ड्रॅगन पॅलेस टेम्पल' असं केलं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाऊ... दादा... साहेब फ्लेक्स काढा! पुणे महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सवर भन्नाट मोहिम, पुणेकरांनो फोटो काढा अन् 'अशी' करा तक्रार

SCROLL FOR NEXT