रांजणपाड्यात ट्रान्स्फॉर्मर पाण्यात उभा
नागरिकांसह पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका
उरण, ता. ५ (बातमीदार) : तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावात महावितरणच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील रहिवाशांना वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर साचलेल्या पाण्यात उभा असल्याने विद्युत प्रवाह (करंट) पाण्यात उतरून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये जीर्ण झालेले विद्युतवाहक, लोखंडी पोल, तारा गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे स्थितीत पडून आहेत. तसेच गावांमध्ये अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर उघडे, झाडाझुडपांमध्ये धोकादायक स्थितीत आहेत. ट्रान्स्फॉर्मर हे उच्च दाबाच्या विजेवर काम करीत असल्यामुळे त्यांच्याजवळ जाणे किंवा निष्काळजी जीवघेणी ठरू शकते. असे असतानाही रांजणपाडा गावातील रहिवाशांना विद्युत पुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मर हा साचलेल्या पाण्यात उभा आहे. यामुळे पावसाळ्यात किंवा दमट हवामानात ट्रान्स्फॉर्मरच्या लोखंडी कुंपणात किंवा खांबांमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांबरोबर पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील धोकादायक ट्रान्स्फॉर्मरचे सर्वेक्षण करून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हा ट्रान्स्फॉर्मर उंचावर असलेल्या कट्ट्यावरच आहे. मात्र आजूबाजूला भराव झाल्यामुळे पाणी पुढे आले आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर फिनिशिंगचे काम पूर्ण केले जाईल.
- विकास गायकवाड, कार्यकारी अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.