मुंबई

खिडकाळीत बेकायदा थिनरचा साठा जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : शिळ-डायघर पोलिसांनी खिडकाळी गावातील स्वप्नील चाळ परिसरातील दोन गोदामांवर कारवाई करून अनधिकृत साठवून ठेवलेला थिनर जप्त केला. या कारवाईत ८१ बॅरलमध्ये भरलेला सुमारे १६ हजार २०० लिटर थिनर, टेम्पो, मोबाईल आणि कथित बनावट डिलिव्हरी चलन असा एकूण १९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ज्वलनशील पदार्थाचा अधिकृत परवाना अथवा वाहतूक-साठवणुकीचे वैध कागदपत्र नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

डायघर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला खिडकाळी कमानीजवळील गोदामामध्ये अनधिकृत थिनरचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नरळे, फुले आणि पथकाने रविवारी (ता. ४) सायंकाळी कारवाई केली. गोदाम क्र. ४ व ५ येथे पाहणी केली असता एका टेम्पोमध्ये २० बॅरल आढळले. प्रत्येक बॅरलमध्ये २०० लिटर थिनर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गोदाम क्रमांक ५ मधून ४१ आणि गोदाम क्रमांक ४ मधून २० बॅरल जप्त करण्यात आले.

गोदामाशी संबंधित अंकित गिरधरभाई पटेल याच्याकडे थिनरच्या खरेदी-विक्रीबाबत कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्याने ‘निशा पेंट्स’च्या नावाने तयार केलेले डिलिव्हरी चलन दाखविले. मात्र, हे चलन अधिकृत नसून एका ॲपद्वारे तयार केल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे थिनरच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT