मुंबई

‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला ‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला

CD

‘उलगुलान’ मोर्चा ठाण्यात अडवला
पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप; सहा-सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

भिवंडी, ता. ५ : आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षण, भोजन आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला विद्यार्थ्यांचा ‘उलगुलान मोर्चा’ ठाणे हद्दीतील खारेगाव येथे पोलिसांनी अडवला. रविवारी (ता. ४) पहाटे २च्या सुमारास विद्यार्थ्यांना मुंबईच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यात आले. या वेळी पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने सहा-सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांना भिवंडीतील रांजनोली नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भिवंडी बायपास येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आंदोलक विद्यार्थी रात्री विश्रांतीसाठी थांबले होते. पहाटे एकच्या सुमारास काही पोलिसांनी विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्यास सांगितल्यानंतर ते खासगी वाहनाने मुंबईच्या दिशेने निघाले, मात्र ही बाब पोलिसांना समजल्यानंतर ठाणे हद्दीतील खारेगाव टोलनाक्यावर विद्यार्थ्यांचे वाहन अडवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोन ते तीन तास ताटकळत ठेवण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या वेळी वाहनात पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध पडल्याचा आरोप करण्यात आला.

पोलिसांचा वेगळा दावा
भिवंडी पोलिसांनी विद्यार्थ्यांना योग्य ती मदत केली असून, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती, मात्र विद्यार्थ्यांकडे जेवण असल्याने त्यांनी पोलिसांच्या जेवणाला नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पाण्याची व्यवस्था केली, असे भिवंडीचे पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांनी सांगितले. मुंबईतील मोर्चाला परवानगी न मिळाल्याने मुंबई पोलिसांनी विद्यार्थ्यांना रांजनोली नाक्यावर आणून सोडले. त्यांना आणताना नेमका काय त्रास झाला, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत भिवंडी पोलिसांनी विद्यार्थ्यांना सहकार्यच केल्याचा दावा बनसोड यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT