मुंबई

कल्याण-डोंबिवली पालिकेमध्ये प्रशासकीय फेरबदल

CD

कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सोमवारी (ता. ५) मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले. आयुक्त अभिनव गोयल यांनी आदेश काढून सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल तसेच कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

शहर अभियंता अनिता परदेशी यांची इतरत्र बदली झाल्यानंतर शैलेश कुलकर्णी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांना विद्यमान कार्यकारी अभियंता (अमृत) पदाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे. सहाय्यक आयुक्तांच्या फेरबदलात धनंजय थोरात यांची ३/क वरून २/ब प्रभागात बदली करून ३/कचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवला आहे. सचिन तामखेडे यांच्याकडे परिमंडळ-२ कार्यालयाची जबाबदारी, तर अभिमान पवार यांच्याकडे ५/ड आणि उमेश यमगर यांच्याकडे १०/ई प्रभागाचा प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. विजय भोईर यांच्याकडे ७/ह प्रभागाची, तर चंद्रकांत जगताप यांच्याकडे सामान्य प्रशासन मुख्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आरोग्य विभागातही बदल करण्यात आले असून डॉ. दीपा शुक्ला यांच्याकडे वसंत व्हॅली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाची, तर डॉ. सपना रामोळे यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात डॉ. योगेश चौधरी आणि डॉ. सुलक्षणा त्रिभुवन यांच्या कार्यभारात अदलाबदल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT