मुंबई

बोरिवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला १.३० लाखांची लाच घेताना अटक

CD

बोरिवली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला १.३० लाखांची लाच घेताना अटक
मालाड, ता. ६ (बातमीदार) : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात एक लाख ५० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर एक लाख ३० हजार रुपये स्वीकारताना बोरिवली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. ५) रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पराडे (वय ३१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार (वय ६५) यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना व त्यांच्या दोन बहिणींना अटक न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्यासाठी पराडे यांनी एक लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २९ सप्टेंबरला एसीबीकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर ३० सप्टेंबरला करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर एक लाख ३० हजार रुपये स्वीकारण्याचे पराडे यांनी मान्य केले.
त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी एसीबीने सापळा रचला. बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून एक लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पराडे यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला असून, घरझडतीची कारवाई सुरू असल्याचे एसीबीने सांगितले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पराडे यांना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४२ वाजता बोरिवली पोलिस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण नावडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक विठ्ठल पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT