मुंबई

आठ वर्षांनंतरही ईएसआयसी रुग्णालय अधुरे

CD

आठ वर्षांनंतरही ईएसआयसी रुग्णालय अधुरे
महिला वॉर्ड सुरू; पुरुष वॉर्डासह एमआयसीयू, पीआयसीयू, एनआयसीयू, सीटी-मयआरआयची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : अंधेरी येथील ईएसआयसी रुग्णालयाला आग लागून तब्बल आठ वर्षे उलटल्यानंतर रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग (आयपीडी) पुन्हा सुरू करण्यात आला आहे, मात्र रुग्णालयातील अनेक महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा अद्याप कार्यान्वित झालेल्या नसल्याने रुग्णांना पूर्ण उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या केवळ २५ खाटांचा महिला वॉर्ड सुरू करण्यात आला असून, पुरुष वॉर्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृह, सीटी स्कॅन आणि एमआरआयची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही.
रुग्णालयात पूर्वी वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू), बाल अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) आणि नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उपलब्ध होते, मात्र या सुविधा सध्या बंद असल्याने गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी अन्य ईएसआयसी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव ॲड. भीमेश मुतुला यांनी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. महत्त्वाच्या सुविधा सुरू नसताना रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा नेमका फायदा काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शस्त्रक्रियेसाठी कांदिवलीचा आधार
रुग्णालयात दाखल होण्याची सुविधा पुन्हा सुरू झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शस्त्रक्रिया किंवा विशेष तपासण्यांची गरज भासल्यास रुग्णांना कांदिवली येथील ईएसआयसी रुग्णालयात जावे लागत आहे. अंधेरी ते कांदिवली असा सुमारे १५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने गंभीर किंवा अशक्त रुग्णांची गैरसोय होत आहे.

दोन मुदती, तरी सुविधा प्रतीक्षेत
सध्या महिला आयपीडी, कॅज्युअल्टी, प्रयोगशाळा, ईसीजी, बाह्यरुग्ण विभाग, रेडिओलॉजी आणि औषधालय सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पुरुष वॉर्ड आणि अतिदक्षता सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आवश्यक आणि बहुविशेषज्ञ सेवा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तर रुग्णालयाचे डीन डॉ. अजय पाटील यांच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२७ पर्यंत रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

SCROLL FOR NEXT