पेन्शनधारकांसाठी ‘महा उपलब्ध’ ॲपची कार्यशाळा
घरबसल्या पेन्शनची माहिती उपलब्ध होणार
कासा, ता. ६ (बातमीदार) : पालघर जिल्हा कोषागार कार्यालयातील सभागृहात मंगळवारी पेन्शनधारकांसाठी ‘महा उपलब्ध’ ॲपविषयी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील सुमारे १०० पेन्शनधारकांनी सहभाग घेतला. ॲपच्या माध्यमातून पेन्शनशी संबंधित विविध माहिती आणि सेवा घरबसल्या उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
कार्यशाळेत सर्वप्रथम ‘महा उपलब्ध’ ॲपची ओळख करून देण्यात आली. पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये अचानक वाढ किंवा कपात का झाली, पेन्शनशी संबंधित विविध नोंदी, आवश्यक कागदपत्रे तसेच फॉर्म क्रमांक १६ यांसह इतर महत्त्वाची माहिती ॲपवर कशी पाहता येते, याबाबतचे ऑनलाइन प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. पेन्शनधारकांना उत्पन्न प्रमाणपत्रासह विविध शासकीय निर्णय (जीआर) व आवश्यक माहितीही घरबसल्या पाहता येणार आहेत. त्यामुळे पेन्शनसंबंधी छोट्या-मोठ्या कामांसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात वारंवार येण्याची गरज कमी होणार आहे. स्वतःच्या मोबाईलवर पेन्शनची माहिती आणि व्यवहार तपासता येणार असल्याने पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कार्यशाळेला राज्य कर्मचारी जिल्हाध्यक्ष एस. शेळके, मारुती वाघमारे, हेमंत धानमेर यांच्यासह पालघर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.