वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने दुगाड येथील रेणुका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ठाणे वनविभागाच्या वतीने सोमवारी (ता. ५) या कार्यक्रमात वनपरिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर शेलार यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व सांगितले.
राज्य सरकारच्या वनविभागातर्फे २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून वने आणि वन्यजीवांचे संरक्षण, निसर्ग संवर्धन तसेच त्यासाठी प्रत्येकाची असलेली जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. भिवंडी तालुक्यातील वनपरिमंडळ दुगाडच्या कार्यक्षेत्रातील रेणुका विद्यालयात विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व, त्यांचे संरक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील नवसमाज विद्यामंदिर, मानिवली-दुगाड फाटा तसेच आदिवासी शासकीय आश्रमशाळा, कवाड येथील विद्यार्थ्यांमध्येही वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर शेलार यांनी दिली.
कार्यक्रमाला वनपरिमंडळ अधिकारी राकेश शेलार (पारिवली), उमेश चव्हाण (गणेशपुरी), वनविभागाचे कर्मचारी संदीप खांजोडे, विकास पाटील, अनिल इंगळे, आरती दगडे, अरुण पाटील, नंदकुमार गावंडा, सुवर्णा सावंत, वृषाली म्हाळुंगे, प्रियांका सरडे, अजय कुवरा, देवराम भोईर, सुधीर लहांगे, विजय गायकवाड, रेणुका विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र पाटील, मीनाक्षी म्हात्रे, शिक्षकवृंद तसेच जिल्हा परिषद शाळा चिरंबेच्या मुख्याध्यापिका मिनल पाटील उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.