मुंबई

मनोरुग्णांप्रती संवेदनशीलता आवश्यक

CD

ठाणे, ता. ६ (बातमीदार) : मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर करून रुग्णांप्रती संवेदनशीलता वाढविणे आवश्यक आहे. मानसिक आजारांच्या जखमा दिसत नसल्या तरी रुग्णांच्या वेदना खोलवर असतात. त्यामुळे उपचारांसोबतच त्यांना मायेचा हात आणि समाजाचा स्वीकार मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. यंदाची ‘अनुभवलेल्या व्यथा ऐकूया, खरे आवाज, खरा बदल!’ ही संकल्पना यावेळी मांडण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पवार होते. त्यांच्या हस्ते मानसिक आरोग्य दिनाच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आरोग्य विभागाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जनजागृती, आरोग्य शिबिरे, बाह्यरुग्ण सेवा, रॅली तसेच विविध उपक्रम राबविले जात असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक, सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी विभाग कार्यरत असून, भविष्यात या सेवा अधिक सक्षम करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रादेशिक मनोरुग्णालय हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मानसिक आरोग्य सेवा देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. मानसिक आजारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे; तसेच उपचारानंतर रुग्णांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती महत्त्वाची असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.


रुग्णांसोबत मायेने वागा!
रुग्णांकडे केवळ रुग्ण म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्याप्रमाणे मायेने, सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे. योग्य उपचारांसोबत आपुलकीचे वातावरण मिळाल्यास रुग्णांच्या पुनर्वसनाला मोठी मदत होते, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले.

बाह्यरुग्ण विभागात जनजागृती
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मानसिक आजार, गैरसमज, उपचार आणि पुनर्वसनाबाबत माहिती देणारे संकल्पनेवर आधारित पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. व्यवसायोपचार विभागात उपचारानंतर सावरलेल्या रुग्णांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. यावेळी काही रुग्णांचा त्यांच्या कुटुंबीयांसह गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT