मुंबई

महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात

CD

शिवसेना-भाजप वाद पोलिस ठाण्यात
महापौरांच्या पतीसह ३० ते ४० जणांवर, भाजप पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : उल्हासनगरातील शिवसेना-भाजपचा सत्तासंघर्ष सभागृहातील आरोप-प्रत्यारोप, सोशल मीडियावरील धमक्या आणि राड्यानंतर थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम आणि त्यांच्या ३० ते ४० समर्थकांवर अश्लील घोषणाबाजी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर निकम यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून भाजपच्या सहा पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पेटलेला शिवसेना-भाजप वाद आता परस्परविरोधी गुन्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. भाजपच्या नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती दीपा पंजाबी यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कमलेश निकम आणि त्यांच्या ३० ते ४० समर्थकांविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे, पंजाबी यांचा मुलगा अविनाश याच्या विरोधात अश्लील घोषणाबाजी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी कमलेश निकम यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भाजप पदाधिकारी मनीष हिंगोरानी, कपिल अडसूळ, अविनाश पंजाबी, गौरव भालेराव, राकेश पाठक आणि प्रदीप रामचंदानी यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आणि अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सुरू झालेल्या संघर्षात कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर वाद अधिक चिघळला. दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात पोलिसांत धाव घेतल्याने राजकीय कुरघोड्यांचे रूपांतर आता कायदेशीर लढाईत झाले असून, दोन्ही गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

---------------

महापौरांचे पती कमलेश निकम महापालिकेत आपल्या समर्थकांसह धिंगाणा घालताना आणि भाजपचे पदाधिकारी मनीष हिंगोरानी, कपिल अडसूळ, कमलेश निकम यांना सोशल मीडियावर धमकी देताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT