मुंबई

कर्जत अतिक्रमणाच्या विळख्यात

CD

कर्जत अतिक्रमणाच्या विळख्यात
पादचारी, वाहनचालक त्रस्त; हातगाडीधारकांच्या पुनर्वसनाची मागणी
कर्जत, ता. ६ (बातमीदार) : कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या हातगाड्या आणि अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बाजारपेठेत पादचाऱ्यांना चालण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांना गर्दीतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
श्रीराम पूल ते कमानीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८/अच्या काही भागात रस्त्याच्या कडेला टपऱ्या आणि इतर अतिक्रमणे वाढली आहेत. महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नेरळ आणि खोपोली परिसरात अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना कर्जत शहरातील अतिक्रमणांकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कर्जत नगर परिषदेने १९९३ पूर्वी १३८ हातगाडी चालकांना अधिकृत बिल्ले दिले होते. दोन वर्षांपूर्वी कर्जत शहर बचाव समितीच्या आंदोलनानंतर या बिल्लाधारकांची यादीही जाहीर करण्यात आली, मात्र काही बिल्लाधारक स्वतः व्यवसाय न करता हातगाड्या भाड्याने देत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. काहींच्या नावावर एकापेक्षा अधिक हातगाड्या असल्याचीही चर्चा आहे.
शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे पादचारी मार्ग आणि वाहतुकीवर परिणाम होत असल्याने हातगाड्यांचे अधिकृत सर्वेक्षण करून पात्र-अपात्र बिल्लाधारकांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कर्जत शहर बचाव समितीचे ॲड. कैलास मोरे यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांवर पाठपुरावा केला आहे, मात्र हातगाड्या आणि अतिक्रमणाचा प्रश्न कायम असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. गरजू हातगाडी व्यावसायिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


- पात्र-अपात्र बिल्लाधारकांचे अधिकृत सर्वेक्षण करावे.

- गरजू व्यावसायिकांना योग्य जागा देऊन अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत.

- अतिक्रमणांमुळे पादचारी आणि वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

रस्ते, शाळा सगळंच बदललं! आता कसं दिसतं 'जत्रा' सिनेमातलं 'ह्यालागाड त्यालागाड' गाव? कुठे झालेलं शूटिंग, पाहा फोटो

रक्षाबंधन आणि कसाब! उज्ज्वल निकम यांनी सांगितली मटन बिर्याणी मागची खरी स्टोरी..

Snake Bite : जीवघेण्या सर्पदंशात बरे होण्‍याचे प्रमाण सर्वाधिक; सर्पदंश झालेल्या ९९ टक्के रुग्णांचे उपचारांनी वाचले प्राण

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

SCROLL FOR NEXT