मुंबई

सर्व्हर डाऊन, ग्राहकांचा खोळंबा!

CD

एलआयसीच्या कार्यालयातील सर्व्हर ठप्प
विमा हप्ता भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर २० येथील एलआयसीच्या सॅटेलाइट कार्यालयातील सर्व्हर वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहेयामुळे विमा हप्ता भरण्यासह विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अनेक तास ताटकळत राहावे लागत असल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
एलआयसीच्या वतीने ग्राहकांना त्यांच्या परिसरातच सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी विविध ठिकाणी विस्तारित व सॅटेलाइट कार्यालये सुरू करण्यात आली आहेत, मात्र या कार्यालयांमध्ये आवश्यक तांत्रिक सुविधा सुरळीत उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे. नेरूळ सेक्टर २० येथील रिद्धी सिद्धी रहिवासी सोसायटी इमारतीतील कार्यालयात सकाळच्या वेळेत विशेषतः विमा हप्ता भरण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते. अनेक नागरिक कार्यालय उघडताच कामावर जाण्यापूर्वी आपला विमा हप्ता भरण्यासाठी येतात, मात्र संगणक सर्व्हरने काम करणे बंद केल्यास त्यांना कार्यालयातच ताटकळत बसावे लागते. काही वेळात सर्व्हर सुरू होईल, असे सांगण्यात येते; परंतु अनेक तासांनंतरही यंत्रणा पूर्ववत न झाल्यास ग्राहकांचा वेळ वाया जातो. या प्रकारामुळे ग्राहकांबरोबरच कार्यालयातील कर्मचारीही त्रस्त असल्याची माहिती आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, अशी कर्मचाऱ्यांचीही भूमिका असली तरी सर्व्हरमधील वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांनाही ग्राहकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

ग्राहकांची तातडीने दुरुस्तीची मागणी
सर्व्हरची समस्या निर्माण झाल्यानंतर जवळच्या खासगी भरणा केंद्रांमध्ये जाऊन हप्ता भरण्याचा पर्याय काही ग्राहकांना सुचविला जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, सध्याच्या ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर अनोळखी किंवा खासगी केंद्रांवर व्यवहार करण्याबाबत ग्राहकांमध्ये साशंकता आहे. यासाठी सर्व्हरची समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT